उत्तर प्रदेशमधील कॉलेज, विद्यापीठात मोबाईलवर बंदी

617

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील कॉलेज व विद्यापीठांमध्ये मोबाईल फोनवर बंदी घातली आहे. उत्तर प्रदेश उच्च शिक्षण विभागाकडून याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. या पत्रकात कॉलेज व विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मोबाईल फोन वापरण्यास बंदी घातल्याचे म्हटले आहे.

योगी सरकारच्या या निर्णयामुळे फक्त विद्यार्थीच नाही तर शिक्षकांना देखीव कॉलेज विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये फोन वापरता येणार नाही. ‘सरकारकडून करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार विद्यार्थी कॉलेजमधील बहुतांश वेळ हा मोबाईल फोनवर वाया घालवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकारडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

याआधी योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत व अधिकाऱ्यांच्या बैठकीत मोबाईल फोनवर वापरण्यावर बंदी घातली आहे. बैठकीदरम्यान काही मंत्री व अधिकारी व्हॉट्सअॅप मेसेज वाचत असल्याचे समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या