मोबाईल टॉवरचे रेडिएशन मोजा

487

मोबाईल टॉवरमुळे होणारे रेडिएशन आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम हा कायमच चर्चेचा आणि वादग्रस्त विषय राहिला आहे. मोबाईल टॉवर्समधून बाहेर पडणाऱया विद्युत-चुंबकीय लहरी (इलेक्ट्रो-मॅग्नेटिक वेव्हज्) या मानवी आरोग्यावर घातक परिणाम करतात की नाही यावर अनेकदा वाददेखील उद्भवत असतात. आता दूरसंचार खात्याने देशभरातील कोणत्याही भागातील मोबाईल टॉवरमधून बाहेर पडणारे रेडिएशन मोजण्यासाठी तसेच या टॉवरच्या इतर कायदेशीर बाबींची माहिती पुरवण्यासाठी एक खास संकेतस्थळच सुरू केले आहे. तरंग संचार (https://tarangsanchar.gov.in/emfportal) या नावाने सुरू करण्यात आलेल्या या पोर्टलवर जाऊन देशातील कोणीही सामान्य नागरिक आपल्या भागातील मोबाईल टॉवरची पूर्ण माहिती घेऊ शकणार आहे. सदर मोबाईल टॉवर हा कोणत्या कंपनीचा आहे, कुठल्या प्रकारातील आहे, कोणाच्या मालकीच्या जागेत आणि कुठे तो उभारण्यात आला आहे, त्याने कायदेशीर निकष पूर्ण केले आहेत की नाही? अशा प्रकारची सर्व माहिती इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशभरातील तब्बल ४,७५,५०० टॉवर्सची माहिती इथे देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या