मराठी अभिनेत्री, मॉडेलने न्यूड फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर खळबळ

32032

मराठमोळी मॉडेल आणि अभिनेत्री निकिता गोखले आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाते. सध्या सोशल मीडियावर तिचीच चर्चा सुरू आहे. निकिताने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पुन्हा एकदा न्यूड फोटो शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवरून शेअर केले हे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

निकिता गोखले ही आपले बोल्ड आणि हॉट फोटो सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने एक न्यूड फोटोशूटही केले. यातील काही फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केल्यानंतर खळबळ उडाली.

न्यूड फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर निकिताच्या नावाची चर्चा आहे. या फोटोमध्ये तिचा बिनदास्त आणि बोल्ड अंदाज दिसून येत आहे. गडद लाल रंगातील लिपस्टिक आणि लाईट न्यूड मेकअपमधील तिचा हॉट अवतार पाहून नेटकरी थक्क झालेत.

बोल्ड फोटो शेअर करण्याची ही निकीताची पहिलीच वेळ नाही. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नग्न, अर्धनग्न आणि बोल्ड फोटो तिने अनेकदा शेअर केले आहेत. मूळची भंडारा जिल्ह्यातील तूमसर या गावची असणाऱ्या निकिताने नागपुरात मार्केटिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि आयआयएफएलमध्ये जॉबला लागली. यानंतर तिने मॉडेलिंगकडे मोर्चा वळवला. निकिताने ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या फिल्म अकॅडमी व टेरन्स ल्युईसच्या डान्स अकॅडमीतही प्रवेश घेतला. यानंतर तिच्या मॉडेलिंगच्या कारकीर्दीला सुरुवात झाली.

निकिता गोखले हिने मिस इंडिया बिकिनी 2015 आणि मिस ग्लॅमर फेस वर्ल्ड 2016 या स्पर्धांवर विजयी मोहर उमटवली आहे. तिने कॉलेज या चित्रपटामध्ये काम केले आहे. 2015 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या