कमालच! पायाचे फोटो शेअर करून महिन्याला लाखो रुपये कमावते ‘ही’ मॉडेल

सोशल मीडियाच्या जमान्यात लोक ब्लॉग लिहून, युट्युब चॅनेल काढून किंवा एक्स्पर्ट बनून पैसे कमवत असतात. त्यात कोरोना आल्याने लोक घरातच अडकल्याने याला जास्तच पेव फुटले आहे. इंटरनेटचा योग्य वापर केल्याने अनेक जण लखपती, करोडपतीही झाले आहेत. यातील एक नाव आहे 23 वर्षीय जॉर्जिया या मॉडेलचे. सोशल मीडियावर पायाचे फोटो शेअर करून ही तरुणी महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहे.

जॉर्जिया मॉडेल आणि रिसेप्शनिस्ट आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमावण्याचा विचार तिच्या मनात आला असता तिने अंतरंगी काम न करता पायाचे फोटो टाकून पैसे कमवू शकतो का यावर विचार केला. जून महिन्यात तिने एक पेजही सुरू केले. या पेजवर सध्या 45 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

जॉर्जिया याच पेजवर आपल्या पायांचे वेगवेगळ्या अँगलने घेतलेले फोटो अपलोड करत असते. हे फोटो विकून ती आठवड्याला 460 युरो (जवळपास 42 हजार) कमावते आणि तिची महिन्याची कमाई 1 लाख 70 हजारांहून अधिक होते.

याबाबत बोलताना जॉर्जियाने सांगितले की, ‘मला मॉडेल बनायचे होते. मात्र कोरोना काळात बाहेर निघण्याची भीती वाटत होती. मात्र न्यूड फोटो टाकून किंवा पोर्नोग्राफी कंटेंट अपलोड करून पैसे कमवण्याऐवजी मी माझे पेज सुरू केले आणि पायाचे फोटो अपलोड करू लागले. लोकांना फोटो आवडत असून माझीही कमाई होत आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या