मोदींचा कारभार पारदर्शक नाही… स्वयंसेवी संस्थेचा अहवाल

37
फोटो: पीटीआय

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

मोदींचा कारभार पारदर्शक नसून हिंदुस्थानमध्ये २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये सर्वाधिक भ्रष्ट्राचार झाला असा दावा एका आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेने केला आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल असे या संस्थेचे नाव आहे. या संस्थेच्या अहवालात जगभरातील सार्वजनिक व खासगी क्षेत्रामध्ये गेल्या दोन वर्षात झालेल्या भ्रष्टाचारासंबंधी लेख प्रसिध्द करण्यात आला आहे. यात अपारदर्शक कारभार असलेल्या देशांच्या क्रमवारीत हिंदुस्थानला  २०१६ साठी ७९ वे स्थान देण्यात आले आहे.

हिंदुस्थानचा २०१५ मध्ये या यादीत हिंदुस्थानचा ७६ वा क्रमांक होता. या वर्षाच्या भ्रष्टाचाराच्या यादीत डेन्मार्क ९० व्या स्थानावर असून, न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे. तिस-या स्थानावर फिनलंड, स्वीडनला चौथे आणि स्वित्झलंडला पाचवे स्थान देण्यात आले आहे.

या अहवालानुसार हिंदुस्थानमध्ये सार्वजनिक व खासगी क्षेत्रात भ्रष्टाचार रोखण्यात सरकारला अपयश आले आहे. त्याचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर झाला असून हिंदुस्थानात गरिबी वाढल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले. याच संस्थेने २०१५ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात भ्रष्टाचाराच्या यादीत हिंदुस्थानचा क्रमांक ७८ वा होता आणि भ्रष्टाचार ३८ टक्के होता. पण २०१६ मध्ये हिंदुस्थानात ४० टक्कयांनी भ्रष्टाचार वाढल्याचे संस्थेने म्हटले आहे. सर्वाधिक भ्रष्टाचारी देशांमध्ये सोमालिया, दक्षिण सुदान, उत्तर कोरिया व सीरिया या राष्ट्रांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या