हा घ्या पुरावा! 10 देशांची आकडेवारी शेअर करत राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरले

काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्था आणि कोरोना संकट यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी 10 देशांची आकडेवारीच ट्विटरला शेअर केली आहे. यात अर्थव्यवस्था आणि कोरोना संकट याबाबत माहिती देण्यात आली आहे. यानुसार इतर देशांच्या तुलनेत हिंदुस्थानची स्थिती चिंताजनक असल्याचे दिसते.

राहुल गांधी यांनी शेर केलेल्या आकडेवारीनुसार बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांपेक्षा हिंदुस्थानची स्थिती खराब असल्याचे दिसते. मोदी सरकारने अर्थव्यवस्था रसातळाला नेली आरोप राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारला घेरत आहेत. कृषी कायद्याविरोधात देखील राहुल गांधी यांनी आक्रमक होत हरयाणा आणि पंजाबमध्ये शेतकऱ्यांची भेट घेत याविरोधात ट्रॅक्टर रॅली काढली होती. तसेच मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या हिताची चिंता नसून, हे सरकार अदाणी आणि अंबानी यांच्यासाठी रस्ता साफ करत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या