हिंदुस्थानची अर्थव्यवस्था वाईट स्थितीत – अखिलेश यादव

635

मोदी सरकार 2.0 ला शनिवारी एक वर्ष पूर्ण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर ‘आज तक’ वृत्तवाहिनीच्या ई-अजेंडा या कार्यक्रमात आलेले उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘मोदी सरकारला सहा वर्षे पूर्ण झाले असून उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकार आहे. आमच्या गावातील गरिबांना अशा होती की अच्छे दिन येणार. अर्थव्यवस्था कोठे उभी आहे याचा खुद्द भाजपनेच विचार करायला हवा होता.’

अखिलेश पुढे म्हणाले की, या सरकारने गावची अर्थव्यवस्था मोडली आहे. जर गावेच आत्मनिर्भर होणार नाही, तर देश कसा आत्मनिर्भर होणार. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे. कोरोनानंतर अर्थव्यवस्था कोलमडली आहे.’ ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या वेदना पंतप्रधानांच्या पत्रात लिहिल्या पाहिजे. मजूर आज पायी चालत आहे. त्यांना असेच सोडून देण्यात आलं आहे. ते रस्त्यावर मरत आहेत. आज जितक्या बस आहेत, त्या चालल्या असत्या तर आज कोलाही पायी चालावं लागलं नसत, असं ते म्हणाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या