कोरोनाचा फैलाव त्सुनामीसारखा, देशाला आर्थिक विध्वंसाला सामोरे जावे लागणार

1435

देशातील कोरोनाचा फैलाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकारला घेरले. कोरोना विषाणूचा फैलाव त्सुनामीसारखा आहे. हिंदुस्थानने केवळ कोरोना विषाणूशी लढण्यासाठी नव्हे तर आर्थिक विध्वंसाला सामोरे जाण्याची तयारी केली पाहिजे. याचा कोटय़वधी लोकांना फटका बसणार आहे, अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

संसदेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. संसदेत सरकारचे ‘वन वे ट्रफिक आहे, असा आरोप त्यांनी केला. हिंदुस्थानला आर्थिक किध्कंसापासून तयार राहायला हवे. मी कारंकार ही गोष्ट सांगत आहे की जनतेला येत्या सहा महिन्यांत कल्पना करता येणार नाही अशा दुŠखद घटनांमधून जावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या