जगातील शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत मोदींना मिळाले नववे स्थान

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

लाईक कराट्विट करा

फोर्ब्स मासिकाने जगातील शक्तीशावी लोकांची यादी प्रसिद्ध केली असून त्यात हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नववे स्थान मिळाले आहे. पहिल्या स्थानावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आहेत. त्यांनी सलग चौथ्यांदा पहिले स्थान पटकावले आहे. अमरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत.

नरेंद्र मोदी हिंदुस्थानातील १३० कोटी जनतेत लोकप्रिय आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि चीनचे शी जिंनपिंग याच्या भेटीत मोदी यांची जागतिक नेते म्हणून वाटचाल सुरु झाली. हवामान बदल, जागतिक तापमान वाढ या मुद्द्यांवर मोदी यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आहे. फोर्ब्स मासिकाने मोदी यांनी केलेल्या नोटबंदीचा उल्लेखही आपल्या लेखात केला आहे. भ्रष्ट्राचार आणि काळा पैसा रोखण्याचा निर्णय मोदींनी घेतल्याचे फोर्सने म्हटले आहे.

जर्मनीच्या चॅन्सेलर एंजेला मार्केल या फोर्ब्सच्या यादीत तीसऱ्या क्रमांकावर आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग चौथ्या स्थानावर आहेत. पोप फ्रान्सिस पाचव्या स्थानावर आहेत. सहावे स्थान अमेरिकेच्या संघराज्य प्रमुख जेनेट येलेन यांना, सातवे स्थान मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी तर आठवे स्थान गुगलचे संस्थापक लॅरी पेज यांनी तर दहावे स्थान फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना मिळाले आहे.