देवभूमीतून काँग्रेसला संपवण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

16

सामना ऑनलाईन । कांगडा

देव आणि राक्षसांच्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. त्यात देवांच्या चांगल्या कामात राक्षस नेहमी विघ्न आणायचे. त्यानंतर त्यांचा पराभव होत होता. आता देवभूमी हिमाचलमधून राक्षसांना संपवण्याची वेळ आली आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर तोफ डागली. कांगडा येथील सभेत ते बोलत होते.

हिमाचलच्या काँग्रेस सरकारने खाणमाफिया, वनमाफिया, ड्रगमाफिया, टेंडरमाफिया आणि ट्रान्स्फरमाफिया असे पाच राक्षस पोसले आहेत. या पाच राक्षसांनी राज्याचे शोषण केले आहे. येत्या 9 नोव्हेंबरला भाजपला मतदान करून या राक्षसांचा पराभव करा असे आवाहन मोदी यांनी मतदारांना केले. हिमाचलचे मुख्यमंत्री आकंठ भ्रष्टाचारात बुडालेले आहेत, मग राज्य भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आश्वासन काँग्रेसने कशाच्या आधारे दिले, असा सवाल करत काँग्रेस म्हणजे लाफिंग क्लब झाल्याची टीका मोदी यांनी केली.

ही तर नेहरूंची भाषा
पंडित नेहरू यांचे सरकार असताना जनसंघाची स्थापना झाली. त्यावेळी जनसंघाला मुळापासून उपटून टाकू असे नेहरू म्हणायचे. त्यामुळे आज आम्ही सडक्या विचारांच्या काँग्रेसपासून देशाला मुक्त करायला निघालो आहोत. ही नेहरूंचीच भाषा असल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या