मोदी १४ एप्रिलला नागपुरात येणार

21

सामना प्रतिनिधी । नागपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिल रोजी नागपुरात येणार आहेत. मोदींच्या हस्ते महानिर्मितीच्या ३२३० मेगावॅट क्षमतेच्या कोराडी, चंद्रपूर आणि परळी येथील वीज संचांचे लोकार्पण केले जाणार आहे. पंतप्रधान दीक्षाय़भूमीलाही भेट देणार आहेत. नागपूर दौऱ्याच्या निमित्ताने पंतप्रधान सरसंघचालकांची भेट घेणार की नाही हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मोदी कोराडीच्या ६६० मेगावॅट क्षमतेचे संच क्रमांक ३ आणि ७ (एकूण १९८० मेगावॅट), चंद्रपूर प्रकल्पातील प्रत्येकी ५०० मॅगावॅटचे संच क्रमांक २ आणि ७ (एकूण १००० मेगावॅट) तसेच परळी प्रकल्पातील प्रत्येकी २५० मेगावॅटचे संच क्रमांक १ आणि ७ (एकूण २५० मेगावॅट) चे लोकार्पण करणार आहेत. कोराडी आणि चंद्रपूर वीज प्रकल्पांना ‘मेगा पॉवर प्रकल्प दर्जा’ देण्यात आला आहे. कोराडी येथील ६६० मेगावॅटचे तीन संच हे सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारित आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यात बुद्ध सर्किट आणि अन्य प्रकल्पांचेही लोकार्पण केले जाण्याची शक्यता आहे.

नागपूर दौऱ्यात पंतप्रधान दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते बाबासाहेबांवरील डाक तिकिटाचे प्रकाशन होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या