Video – राष्ट्रगीत सुरू असताना मोहम्मद सिराजला अश्रू अनावर

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील संधी मिळाली आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना सिराज भावूक झाला व त्याला अश्रू अनावर झाले होते. त्याचा रडतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सिराज भावूक झाला असला तरी त्याने कसोटीची सुरुवात मात्र दमदार केली आहे. सिराजने तिसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरला माघारी पाठवले.

पहिल्या कसोटीत उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्याने दुसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली.
त्याने या संधीचे सोने देखील केले. मात्र या सामन्यांमध्ये खेळण्यासाठी सिराजला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच सिराजच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्यामुळे सिराजला वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी जाता आले नाही.

मोहम्मद शमी व उमेश यादव हे दोन अनुभवी गोलंदाज संघात असताना सिराजला संधी मिळणं थोडं मुश्कील होतं. मात्र हे दोन्ही गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने सिराजला संधी मिळाली. मोहम्मद सिराज याचे वडील मोहम्मद गाउस यांचे 20 नोव्हेंबरला वयाच्या 53 व्या वर्षी निधन झाले.  ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्याने सिराजला वडिलांच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहता आले नव्हते.

आपली प्रतिक्रिया द्या