नको ते राष्ट्रपतीपद!

19

सामना प्रतिनिधी । मुंबई

राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच खुद्द सरसंघचालक भागवत यांनी राष्ट्रपतीपद मिळाले तरी स्वीकारणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आणि राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात येताना राजकारणाचे सर्व मार्ग मी बंद केले होते. त्यामुळे आता राष्ट्रपती होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाल जुलै २०१७ मध्ये संपणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले असून मोदी सरकारनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या पदासाठी अनेकांची नावे समोर येत आहेत. यामध्ये मोहन भागवत यांच्या नावाची चर्चा आहे. हिंदुस्थानला हिंदुराष्ट्र बनवायचे असेल तर मोहन भागवत हेच राष्ट्रपतीपदासाठी उत्तम पर्याय आहेत अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी मांडल्यामुळे भागवतांच्या नावाची जोरदार चर्चा देशभर सुरू झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या