आपण देव झालो, असे मानू नका

‘‘कर्तृत्वाच्या उंचीला विचारांची खोली हवी. कौतुक कानापर्यंतच हवे, डोक्यात जाऊ नये. लोक ठरवतील तुम्ही कोण आहात? आपण देव झालो, असे आपणच मानू नये,’’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

पुण्यातील एका कार्यक्रमात भागवत म्हणाले, ‘‘मणिपूरमध्ये आपण भारतीय नाहीत, अशी भावना होती. भैयाजी काणेंसारख्या अनेकांनी तिथे स्वत:ला गाडून घेतले. आज आपण भारतीय आहोत, असे तिथले लोक म्हणतात. असे चांगले होणे काहींना नको असते. तिथे अस्वस्थता त्यातून आली. अशा कठीण काळातही संघाचे लोक तिथे ठाण मांडून आहेत. पळून गेलेले नाहीत.