‘देश चालवणाऱ्यांना कोणत्याही व्यक्तीची राष्ट्रभक्ती मोजायचा अधिकार नाही’

सामना ऑनलाईन, भोपाळ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देश चालवणाऱ्यांना कोणत्याही व्यक्तीची राष्ट्रभक्ती मोजण्याचा अधिकार दिलेला नाही असं म्हटलं. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रभक्तीचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपाला चपराक मानली जात आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ इथे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते.

या कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले की राष्ट्रभक्ती ही कोणाची संपत्ती नाहीये, राष्ट्रभक्तीशी आपण नैतिकदृष्ट्या बांधले गेलेलो असतो. आणि ही दाखवण्याची गोष्ट नाहीये.

यापूर्वी मध्यप्रदेशातीलच बैतूल इथे बोलताना मोहन भागवत म्हणाले होते की हिंदुस्थानात पैदा झालेली प्रत्येक व्यक्ती ही हिंदू असते. इंग्लंडमध्ये इंग्लिश लोकं राहतात, अमेरिकामध्ये अमेरिकी लोकं राहतात जर्मनीमध्ये जर्मन राहतात तसे हिंदुस्थानात सगळे हिंदू राहतात असं त्यांनी म्हटलं होतं. मुसलमानांचा धर्म मुस्लिम धर्म असेल मात्र त्यांचं राष्ट्रीयत्व हे हिंदूच आहे. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रभक्तीचं विधान पुढे आल्यानं भाजपामध्ये खळबळ माजणं स्वाभाविक मानलं जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या