टी-२०मध्ये त्रिशतकाचा धमाका

16

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

२१ वर्षांच्या दिल्लीच्या एका फलंदाजाने ७२ चेंडूत ३०० धावा कुटत टी-२० क्रिकेट सामन्यात धमाका केला. मोहित अहलावत असं या क्रिकेटपटूचं नाव असून दिल्लीत खेळवल्या गेलेल्या एका स्थानिक सामन्यात त्याने हा विक्रम केला. फ्रेंडस प्रिमियर लीग असं या स्पर्धेचं नाव होतं. ज्यामध्ये मोहिनते ३९ षटकार आणि १४ चौकार मारत ३०० धावा केल्या. म्हणजेच मोहितने २३४ धावा फक्त षटकारातून वसूल केल्या तर ५६ धावा चौकारातून वसूल केल्या. २५० धावांपर्यंत पोहचल्यानंतर मोहितने पुढच्या ५० धावा अवघ्या १२ चेंडूंमध्ये पूर्ण केल्या.

दिल्लीतील ललिता पार्कमध्ये हा सामना खेळवण्यात आला होता. मोहितच्या या त्रिशतकी खेळीमुळे त्याचा संघ मावी इलेव्हनने ४१६ धावा धावफलकावर लावल्या होत्या. विशेष म्हणजे मोहितने नाबाद त्रिशतक फटकावलंय. मोहित हा दिल्ली रणजी संघात यष्टीरक्षक म्हणून भूमिका बजावतोय, मोहितने आत्तापर्यंत ३ प्रथम वर्ग सामने खेळला असून त्याला फक्त ५ धावा करता आल्या होत्या.

 

आपली प्रतिक्रिया द्या