‘आरे’रेss भाजपकडून आंदोलकांचा प्रचंड अपमान; केली ‘दाऊद’शी तुलना

3918
mohit-bharatiya

भाजपच्या पदाधिकाऱ्याचा प्रताप… हक्कांसाठी लढणाऱ्या आंदोलक नागरिकांचा भाजपकडून प्रचंड मोठा अपमान… आंदोलकांबद्दल भाजपचे पदाधिकारी काय म्हणाले… वाचा इथे…

पर्यावरणाच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या आरे आणि नाणारच्या आंदोलकांना राज्यातून किंवा देशातूनच नाही तर जगभरातून प्रतिसाद मिळाला होता. अशा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. मात्र असे असले तरी भाजपच्या नेत्यांनी यावर टीका करताना पातळी सोडल्याचेच पाहायला मिळत आहे.

आरे आणि नाणारमधील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मराहाष्ट्र सरकारच्या निर्णयावर भाजप मुंबईचे सरचिटणीस मोहित भारतीय यांनी टीका केली आहे. मात्र अशी टीका करताना त्यांनी आंदोलकांची तुलना थेट मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत केली आहे. मीडियाप्रमाणे सूत्रांचा आधार घेतल्याचे दाखवत मोहित भारतीय यांनी ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये मोहित भारतीय म्हणतात की, ‘सूत्र: दाऊद विरोधातील गुन्हे देखील महाराष्ट्र सरकारकडून माफ केले जाऊ शकतात. सध्या गुन्हे मागे घेण्याचा मौसम सुरू आहे. त्वरा करा, मर्यादित दिवस…’

सरकारवर टीका करण्याच्या नादात मोहित यांनी सर्वसामान्य नागरिक जे आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात, तसा अधिकार देखील त्यांना असताना त्यांची तुलना थेट कुख्यात दाऊदसोबत केली आहे. यामुळे राज्यातून संतापाची लाट उसळली आहे. नेटकऱ्य़ांनी मोहित आणि भाजपच्या विरोधात ट्विटरवरून टीकेची झोड उठवली आहे.

‘आपने देश द्रोही Dawood की बरोबरी Aarey और nanar रेफ़िनीयरी आंदोलन कारियों से की। धिक्कार है ऐसी सोच का। निषेध। देखिए @Dev_Fadnavis @narendramodi @rajnathsingh @JPNadda @AmitShah
ji मुंबई भाजपा के कार्यकर्ता क्या बोल रहे।’, असे नरेश जैन नावाच्या एका युजरने म्हटले आहे.

सचिन खेतल यांनी देखील अशा तुलनेसाठी मोहित भारतीय यांच्या विरोधात निषेध नोंदवला आहे. ते म्हणतात, ‘आपण देश द्रोही #दाऊद ची बारोबरी #Aarey आणि #nanar रिफायनरी चळवळी मध्ये भाग घेणाऱ्या देश भक्ताशी केलात . अशा विचारांचा धिक्कार. #निषेध’

आपली प्रतिक्रिया द्या