श्रीकांत ठाकरे यांना मोहम्मद रफी जीवनगौरव

सामना प्रतिनिधी । मुंबई

प्रख्यात गायक मोहम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्त ‘स्पंदन आर्ट’ या संस्थेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार ख्यातनाम संगीतकार श्रीकांत ठाकरे यांना मरणोत्तर देण्यात येणार आहे, तर गायिका पूनम श्रेष्ठा यांना मोहम्मद रफी पुरस्कार देण्यात येणार आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते रविवार, २४ डिसेंबर रोजी हे दोन्ही पुरस्कार देण्यात येणार आहेत. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याचे स्पंदन आर्टच्या वतीने भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार ऍड. आशीष शेलार यांनी सांगितले. यावेळी प्रसाद महाडकर यांच्या ‘जीवनगाणी’च्या वतीने रफींच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.