पुण्यात प्राचार्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

31

सामना प्रतिनिधी । पिंपरी

पिंपरीमध्ये प्राचार्यांने प्राध्यापिकेचा विनभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दापोडी येथील सी. के. गोयल कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी प्राचार्य विकास पवार (५८) यांच्याविरोधात भोसरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राचार्य पवार यांच्याविरोधात कॉलेजमधील ५५ वर्षांच्या प्राध्यापिकेने तक्रार दाखल केली होती. संबंधीत महिलेने याप्रकरणी आधी संस्थेच्या ‘विशाखा समिती’कडे तक्रार केली होती. मात्र तक्रारदाराच्या म्हणण्यात तथ्य नसल्याचा अहवाल विशाखा समितीने दिला. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. प्राचार्य पवार यांनी ६ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत माझे फोटो काढले तसेच विनयभंग केला असे प्राध्यापिकेने तक्रारीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी महिला फौजदार पाटील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या