लग्नसमारंभासाठी आलेल्या चिमुरडीचा हॉटेलच्या सफाई कामगाराने केला विनयभंग

865

आई-वडिलांसोबत एका लग्नसमारंभासाठी गेलेल्या मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. यवतमाळमधील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. या मुलीचं वय 10 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या कॅमेऱ्यातील दृश्ये पोलिसांनी तपासासाठी आपल्या ताब्यात घेतली होती. या दृश्यांच्या आधारे पोलिसांनी अक्षय चांदेकर नावाच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश

 

अक्षय हा या हॉटेलमध्ये काही महिन्यांपूर्वीच कामाला लागला होता असं सांगण्यात येत आहे. तो हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करत होता. लग्नासाठी आलेल्या मुलीला अक्षयने खाऊचं आमीष दाखवलं आणि एकांतात नेलं. आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून त्याने या मुलीचा विनयभंग केला. या घटनेने घाबरलेल्या मुलीने सगळा प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला, त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही दृश्ये पाहिली आणि त्याच्या आधारे तत्काळ अक्षयला ताब्यात घेतले.

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा मुद्दा बुधवारी महाराष्ट्राच्या विधीमंडळात उपस्थित करण्यात आला होता. यावेळी अशा अत्याचारांना पायबंद बसावा या दृष्टिकोनातून आंध्र प्रदेशच्या ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर विधान मंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात कायदा आणण्यात यावा, या कायद्याच्या कालबद्ध अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध व्यवस्था निर्माण करावी असे निर्देश मंगळवारी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देण्यात आले.

राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेविषयी उपाययोजना करण्याबाबत बुधवारी विधान भवनात बैठक पार पडली. या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, आंध्र प्रदेशला भेट देऊन ‘दिशा’ कायद्याविषयी तेथील मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच इतर मंत्री आणि पोलीस प्रमुखांशी चर्चा करून माहिती घेतली. राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन या कायद्याच्या धर्तीवर कायदा राज्यात करण्यासाठी विचारात घ्यायचे मुद्दे आदी अनुषंगाने अभ्यास करून कायद्याचा मसुदा करण्यासाठी समिती गठीत केली आहे. ही समिती निर्धारित कालावधीत मसुदा सादर करेल. त्यानुसार विधान मंडळाच्या सभागृहामध्ये लवकरच मंजुरीसाठी हा कायदा आणला जाईल.

या बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, गृहमंत्री अनिल देशमुख, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर, शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुरक्षा) मिलिंद भारंबे, मुंबईचे सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या