जीन्स, टीशर्ट घातलेल्या महिलांचा विनयभंग करायचा; विकृत आरोपीला अटक

1162

नागपुरातील अंबाझरी पोलिसांनी एका विकृताला अटक केली आहे. महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. विजय मेश्राम (वय-32) असे या आरोपीचे नाही आहे. विजय हा जीन्स आणि टीशर्ट घातलेल्या महिलांचा विनयभंग करत होता असे पोलिसांनी सांगितले आहे. धक्कादायक बाब ही आहे की त्याने आतापर्यंत किमान 50 महिलांचा विनयभंग केला आहे.

3 जून रोजी एक तरुणी तिच्या भावासोबत रस्त्याने जात असताना विजयने तिचा विनयभंग केला. तरुणीच्या भावाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र विजय बाईकवर असल्याने पळून गेला. तरुणीने तातडीने पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे बाईकनंबर शोधून काढला आणि त्याचा मालक कोण आहे हे देखील शोधले. यावरून त्यांना विजय मेश्राम याची माहिती मिळाली. या तरुणीचा विनयभंग केल्यानंतर त्याने काही अंतर दूर आणखी एका महिलेचा विनयभंग केल्याचेही पोलिसांना कळाले. सीसीटीव्हीच्या आधारे सगळी माहिती गोळा केल्यानंतर अवघ्या 4 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली.

विजयने पोलिसांना सांगितले की तो संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेतच विनयभंग करत होता. जीन्स आणि टीशर्ट घातलेल्या महिलांना, तरुणींना आपण टार्गेट करत होतो असंही त्याने सांगितले आहे. 10 महिन्यात किमान 50 महिला, तरुणींचा विजय मेश्राम याने विनयभंग केल्याते सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या