
आंध्र प्रदेशातील विशाखपट्टणम येथील राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडच्या स्टील कारखान्यात सुमारे 1,600 अंश सेल्सिअस एवढे तापमान असलेले वितळलेले लोखंड कामगारांवर पडले. या धक्कादायक अपघतात 8 कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक कामगार जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, कारखान्यात क्रेनच्या मदतीने मोठय़ा बकेटमधून वितळलेले लोखंड नेण्यात येत होते. बकेटचे संतुलन बिघडले आणि त्यातील लोखंड खाली काम करणाऱ्या कामगारांवर पडले. हा प्रकार घडताच कारखान्यात खळबळ उडाली. कारखान्यातील बचाव पथकाने तत्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.




























































