‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात

1335

सध्या सगळीकडे लग्नाचा मोसम सुरू झाला आहे. अनेक जणांकडे लग्नसोहळे रंगत आहेत. मग अशात सेलिब्रिटी कसे मागे राहतील. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री नेहा पेंडसेच्या लग्नाची तारीख जाहीर झाली होती. आता, अजून एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे.

मनोरंजन विश्वातल्या छोट्या पडद्यावर जस्सी हे लोकप्रिय पात्र साकारणारी अभिनेत्री मोना सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मोनाचे नाव यापूर्वी अभिनेता विद्युत जामवालसोबत चर्चेत होते. त्यानंतर ती करण ओबेरॉयलाही डेट करत होती. पण, ती दक्षिण हिंदुस्थानातल्या एका इन्व्हेस्टमेंट बँकरशी लग्न करणार आहे. ती सध्या एकता कपूरच्या हमसफर या मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.mon

आता ती 15 डिसेंबरपर्यंत चित्रीकरण पूर्ण करून सुट्टीवर जाणार आहे. या सुट्टीत ती लग्न करण्याची शक्यता आहे. मात्र, तिच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. विवाहसोहळा आटपून ती आमीर खानच्या लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जाणार असल्याचाही अंदाज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या