सोमवारपासून ट्रान्स हार्बरवरही अत्यावश्यक कामगारांसाठी लोकल

530
western-railway-local
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेवर अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी मुख्य आणि हार्बर मार्गावर सध्या ३५० लोकल फेऱ्या सुरू आहेत. सोमवार दि. १३ जुलैपासून ठाणे ते वाशी दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर आणखीन दोन फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेतर्फे अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात एकूण फेऱ्यांची संख्या आता ३५२ इतकी होणार आहे.

वाशी येथे जाण्यासाठी विशेष लोकल ठाण्यावरून सकाळी सुटेल आणि परतीच्या प्रवासासाठी संध्याकाळी वाशी येथून विशेष लोकल ठाण्याकरीता सुटेल. या विशेष फेऱ्यांना रबाळे, कोपरखैरणे, तुर्भे आणि सानपाडा या स्थानकांवर थांबा देण्यात येईल. राज्य सरकारने निश्चित केलेल्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाNयांना या निवडक उपनगरी सेवांमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. इतरांनी स्थानकांवर गर्दी करू नये अशी विनंती मध्य रेल्वेने केली आहे. या लोकल सर्व सामान्य प्रवाशांसाठी नाहीत. कोविड-१९ साठीचे सर्व प्रोटोकॉलचे पालन अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनी करावे अशी विनंती रेल्वेने केली आहे.

मध्य रेल्वेने १५ जूनपासून अत्यावश्यक कर्मचाNयांसाठी मर्यादित प्रमाणात लोकलसेवा सुरू केली आहे. आता मध्य रेल्वे ३५२ तर पश्चिम रेल्वे ३५० फेऱ्यांयांद्वारे अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना सेवा देत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या