
मनी लॉण्डरिंग प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांना ईडीने अटक केली आहे. ईडी त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करून गोखले यांची न्यायालयीन कोठडी घेणार आहे. क्राऊड फंडिंग प्रकरणात गोखले यांना गुजरात पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने 29 डिसेंबर 2022 ला दिल्लीमधून अटक केली होती. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती, मात्र आता त्यांना ईडीने अटक केली आहे. ‘अवर डेमोव्रेसी’ या ऑनलाईन व्यासपीठावरून गोखले यांनी लोकांकडून सुमारे 1.07 कोटी रुपये गोळा केले, मात्र त्यांनी लोकांचे हे पैसे वैयक्तिक कारणांसाठी खर्च केले, असा आरोप गुजरातमधील तक्रारदाराने केला आहे. तक्रारदाराने गोखले यांना ऑनलाईन काही पैसे देणगी दिले होते. आतापर्यंत गुजरात पोलिसांनी त्यांना तीन वेळा अटक केली आहे.