वॉलेट-टू- वॉलेट पैशांचे डिजिटल व्यवहार लवकरच शक्य

41

सामना ऑनलाईन । मुंबई

नोटाबंदीनंतर पैशाच्या व्यवहारांसाठी डिजिटल वॉलेटचे पर्याय समोर आले होते. आपल्या बँक खात्यातून थेट किंवा डेबिट कार्डाच्या माधम्याने डिजिटल वॉलेटमध्ये पैसे भरता येत होते. मात्र, एका वॉलेटमधून दुसऱ्या वॉलेटमध्ये पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. पण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ही अडचण दूर केली आहे. पेटीएम किंवा मोबिक्विकसारख्या डिजिटल वॉलेट्समधून आता पैशाची देवाण घेवाण करणं शक्य आहे.

आरबीआयतर्फे लवकरच युनिफाईड पेमेंट इंटरफेस या प्रणालीच्या साहाय्याने डिजिटल वॉलेट्स एकमेकांशी जोडली जाणार आहेत. यासंबंधी आरबीआयची नवीन मार्गदर्शक तत्त्वं लवकरच प्रकाशित केली जाणार आहेत. त्यानुसार वॉलेट टू वॉलेट ट्रान्सफर हे व्यवहाराचं नवीन माध्यम म्हणून सुरू करण्यात येणार आहे. या डिजिटल व्यवहारासाठी शुल्क आकारणीही निश्चित करण्यात येणार आहे. आरबीआय निश्चित करेल. येत्या २-३ महिन्यांत ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या