मुसळधार पावसामुळे धरणसाठय़ात वाढ;दारणा 41, गंगापूर 35 टक्के भरले

298

सामना ऑनलाईन, नाशिक

दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा 13 टक्क्यांवरून 35 टक्क्यांवर पोहचला, तर भावली 42, दारणा 41 टक्के भरले आहे. नांदुरमधमेश्वरमधून 27 हजार 980 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, आज पावसाने विश्रांती घेतल्याने गोदावरीचा पूर ओसरला आहे.

नाशिकला पाणीपुरवठा करणाऱया गंगापूर धरणाची साठवण क्षमता 5 हजार 630 दशलक्ष घनफूट असून, आजचा पाणीसाठा 1968 दशलक्ष घनफूट (35 टक्के) इतका आहे. जिह्यातील दुसऱया क्रमांकाचे मोठे धरण असलेल्या मुकणे धरणाची साठवण क्षमता 7 हजार 239 द.ल.घ. इतकी असून, साठा 868 द.ल.घ. (12 टक्के) झाला आहे. दारणा धरणाची क्षमता 7 हजार 149 द.ल.घ. इतकी असून, सायंकाळपर्यंत हे धरण 2 हजार 963 द.ल.घ. (41.25 टक्के) भरले आहे. भावलीत 599 द.ल.घ. (42 टक्के) साठा झाला आहे. जिह्यात 24 पैकी 7 मोठी, तर 17 मध्यम धरणे आहेत. त्यापैकी गंगापूर धरण समूह, दारणा, मुकणे, भावलीच्या नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला. इतर धरणांच्या क्षेत्रात पावसाने समाधानकारक हजेरी लावली नसल्याने तेथील साठा अजूनही अत्यल्प आहे.

24 तासात 726 मिलिमीटर पाऊस
नाशिक जिह्यात रविवारी सकाळी 8 ते सोमवारी सकाळी 8 या चोवीस तासात एकूण 726 मिलिमीटर पाऊस झाला. त्र्यंबकेश्वरला सर्वाधिक 200, पेठमध्ये 116, तर नाशिकला 102.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे – नाशिक – 102.9, इगतपुरी – 63, दिंडोरी – 42, पेठ – 116.2, त्र्यंबकेश्वर – 200, मालेगाव – 1, नांदगाव- 0, चांदवड – 11, कळवण – 6, सटाणा- 4, सुरगाणा – 56, देवळा – 1, निफाड- 28, सिन्नर – 79, येवला – 15.

धरणनिहाय पाणीसाठा
दशलक्ष घनफूटमध्ये, कंसात टक्केवारी  गंगापूर- 1968 (35),कश्यपी – 453 (24), गौतमी-गोदावरी – 398 (21), आळंदी – 134 (14), पालखेड- 120 (18), करंजवण – 117 (2), वाघाड – 143 (6), ओझरखेड – 53 (2), पुणेगाव – 0, तिसगाव – 0, दारणा – 2963 (41), भावली – 599 (41.74), मुकणे – 868 (12), वालदेवी – 37 (3), कडवा – 133 (8), भोजापूर – 0, चणकापूर – 0, हरणबारी – 30 (3), केळझर – 0, नागासाक्या – 0, गिरणा – 1374 (7), पुनद – 36 (3), माणिकपुंज – 0, एकूण साठा – 9250 (14).

आपली प्रतिक्रिया द्या