सरकारी पाऊसही उशिराच; 6 जूनला केरळात तर 15 जूनला मुंबईत

सामना ऑनलाईन । मुंबई

स्कायमेट या खासगी हवामान विभागाने मान्सून केरळात 4 जून रोजी धडकणार हा अंदाज व्यक्त केल्यानंतर बुधवारी हिंदुस्थानी हवामान विभागानेही मान्सून 6 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मान्सूनची सरकारी गाडीही महाराष्ट्रात उशिराच पोहोचणार असल्याचे उघड झाले आहे. मान्सून अंदमान आणि निकोबार बेटावर 19 मे रोजी पोहोचेल. त्यानंतर त्याची पुढची वाटचाल सुरू होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मान्सूनची केरळात दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख 29 मे किंवा 1 जून आहे. परंतु, यंदा मान्सूनचे आगमन 4 ते 5 दिवस उशिरा होणार आहे.

वर्ष             अंदाज               आगमन

  • 2018         28 मे               30 मे
  • 2017         30 मे              30 मे
  • 2016         6 जून              8 जून
  • 2015         30 मे              5 जून
  • 2014         2 जून              5 जून

यंदाचे पावसाचे प्रमाण (टक्क्यांमध्ये)

सरकारी     स्कायमेट

   96         93