पावसाळ्यातील कूल फॅशन

सामना ऑनलाईन। मुंबई

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले कि नोकरी, शिक्षणा निमित्त घराबाहेर पडणाऱ्या समस्त महिलांना एकच प्रश्न पडतो आज कोणता ड्रेस घालू. कारण पावसाळा सुरु आहे. मग अशावेळी अनेकजणी पावसात कपडे भिजणारच या विचाराने काहीही घालून ऑफिसात, कॉलेजात जातात. पण तसे न करता थोडी कल्पकता वापरली तर पावसाळ्यातही कूल फॅशन करता येते. यासाठी काही टीप्स..

 • पावसाळ्यात शक्यतो कॉटनचे व गडद रंगाचे कपडे घालू नयेत. त्याऐवजी सिंथेटीकचे कपडे घालावेत.
 • गडद रंगाचे ,ब्लॉक प्रिंट, बांधणीचे ड्रेस घालू नयेत. कारण भिजल्यानंतर या कपड्यांचा रंग सुटतो.
 • पायघोळ सलवार, पटीयाला, यांऐवजी अँकल लेन्थ लेगिंग्ज, थ्रीफोर्थ, पँट घालाव्यात त्यावर शॉर्ट कुडता व गळ्यात स्टोल अडकवावा.
 • पावसाळ्यात लांबलचक स्कर्ट पेक्षा मिडी स्कर्ट घालणे सोयीचे ठरते.
 • हल्ली बाजारात सिंथेटीक मटेरिअलच्या ट्राऊजर मिळतात. या ट्राऊजरवर फूल किंवा मिडियम लेन्थ कुरताही छान दिसतो.
 • त्यावर पावसाळी सँण्डल किंवा बूटही शोभून दिसतात.
 • या दिवसात लेदरच्या बॅग्जऐवजी प्लास्टिकच्या बॅग्ज वापराव्यात.
 • छत्र्यांपेक्षा रेनकोट वापरणे कधीही उत्तम. पण रोजच्या प्रवासात त्याची नेआण करणे त्रासदायक आहे. पण तरीही जमेल तेव्हा रेनकोट वापरावा.
 • या दिवसात केस मोकळेच ठेवावेत.
 • भरपूर ज्वेलरी न घालता हलकीफुलकी प्लास्टिकचे कानातले व गळ्यातले घालावेत.
 • हलका मेकअप करावा.