गेल्या 9 वर्षात पहिल्यांदाच पाऊस देशात बराच काळ रेंगाळला आहे. गेले 3-4 दिवस देशाच्या अनेक भागात,खासकरून मुंबईमध्ये पाऊस गायब झाला आहे. मात्र राज्यात आणि देशात पावसाचे आणखी काही दिवस शिल्लक असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवलेल्या अंदाजात म्हटले आहे की 25 आणि 26 सप्टेंबर पर्यंत पुणे नाशिक आणि मालेगांवमध्ये दमदार पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही 26 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. 27 सप्टेंबरपर्यंत देशाच्या विविध भागात खासकरून राजस्थानात पाऊस पडत राहील आणि त्यानंतरच पावसाचा परतीचा प्रवास सुरू होईल असा अंदाज आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाऊस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशभरात रेंगाळणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 3 ते 4 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा देशात मुक्काम कायम असेल असा अंदाज आहे.