पावसाळ्यातल्या खमंग रेसिपीज

1715

संगिता भिसे। पुणे

पावसाळा म्हटलं कि डोळ्यासमोर येतात ती खमंग भजी व गरमागरम चहा. या दिवसात भजी खाण्याचा आनंद वेगळाच असतो. पण पावसाळा तीन महिने मुक्कामी असल्याने सतत एकाच चवीची भजी खाण्याचा नंतर कंटाळा येवू लागतो. पण थोडी कल्पकता वापरून वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवणे अशक्य नाही. अशाच काही या रेसिपीज आज मी घेऊन आले आहे. झटपट तयार करता येणाऱ्या पावसाळ्याचा आनंद द्विगुणित करणाऱ्या.

पापडाची भजी

udit-papad-pakoda
साहीत्य…४ उडीदाचे कच्चे पापड़, एक ते दीड कप ताक, एक कप तांदळाचे पीठ, एक चमचा आलं मिर्चीची पेस्ट, थोडी कोथिंबिर, अर्धा चमचा हळद,चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल

कृती:- एका बाऊल मधे पापडाचे तुकडे घेऊन त्यावर ताक घाला, थोडावेळ भिजु द्या. भिजल्यानंतर हाताने कुस्करून घ्या. त्यात आलमिरची पेस्ट, हळद, मीठ घालून त्याचे एकसारखे गोळे बनवा. नंतर गरमगरम तेलात तळून घ्या. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व करा.

पालक बटाटा भजी

palakसाहीत्य..दोन मोठे उकडलेले बटाटे, एक बाऊल बारीक चिरलेला पालक, दोन कप बेसन, हिंग, चार टेबलस्पून तांदूळ पीठी, एक चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, थोडी कोथिबिंर, चवीनुसार मीठ, पाव चमचा खायचा सोडा

कृती:– बटाटे कुस्करुन घ्यावेत. त्यात चिरलेला पालक टाकावा. हे मिश्रण एकजीव करुन घ्यावे. त्यात तिखट, मीठ व खायचा सोडा टाकावा. नंतर एका बाऊल मधे बेसन व इतर सर्व साहित्य घालून घ्या.. व पीठ पाणी घालून भिजवा.. पीठ साधारण डोश्याच्या पीठा प्रमाणे ठेवावे. तयार मिश्रण पीठात घालावेत. एक एक करून भजी सोनेरी रंगावर तळून घ्यावी. हिरव्या चटणीबरोबर किंवा नुसतीही छान लागतात.

मक्याच्या दाण्यांची भजी…

corn-pakoda

साहित्य…पाच कणसांचे (स्वीट कॉर्न)दाणे, एक चमचा तिखट, एक चमचा मीठ, दिड चमचा गरम मसाला, अडीच वाटी बेसन, तेल.

कृति:-मक्याचे दाणे धुऊन मिक्सरमधुन काढणे, त्यात तिखट,मीठ, गरम मसाला व जेवढे मावेल तेवढेच बेसन व अर्धा डाव तेल गरम करून घालावे. मिश्रण एकत्र करावे. अजिबात पाणी घालू नये. कढईत तेल चांगले तापले की छोटी छोटी भजी तळून घ्यावीत. सॉस बरोबर छान लागतात.

आपली प्रतिक्रिया द्या