संसदेचे पावसाळी अधिवशेन लवकरच होणार – संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी

432

कोरोनाच्या जागतिक संकटामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. कोरोनाचा परिणाम संसदेच्या कामकाजावरही झाला आहे. कोरोना फैलावाच्या शक्यतेमुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन कसे होणार असा प्रश्न उभा ठाकला आहे. मात्र, संसदेचे पावसाळी अधिवेशन लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. योग्य ती खबरदारी आणि सुरक्षेच्या उपाययोजना करून संसदेचे पावसाळी अधिवेश लवकरच घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

संसदेचे पावसाळी अधिवेशन लवकरच घेण्याबाबत तयारी करण्यात येत आहे. अधिवेशनाबाबतच्या सर्व औपचारिकता सरकार पूर्ण करत आहे. तसेच कोरोनाच्या संकटात योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. प्रत्येक सदस्याच्या आरोग्याच्या सुरक्षिततेचा विचार करून योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असेही जोशी यांनी सांगितले. संसदेच्या दोन्ही सभागृहातील महासचिवांना पावसाळी अधिवेशनासाठी आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिवेशन काळात सदस्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळता येतील याप्रमाणे व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. ही सर्व तयारी पूर्ण झाल्यावर खबरदारीच्या उपाययोजना करत अधिवेशन घेण्यात येईल, असे जोशी यांनी स्पष्ट केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या