प्रो-कबड्डी लिलाव,मोनू गोयतची १.५१ कोटींची झेप

39

सामना ऑनलाईन, मुंबई

कबड्डी या महाराष्ट्राच्या मातीतल्या खेळाने प्रो-कबड्डीच्या माध्यमातून उत्तुंग झेप घेतली असून आता तर कबड्डीपटूंचे भावही गगनाला भिडले आहेत. प्रो-कबड्डीच्या आगामी मोसमासाठीचा लिलाव मुंबईत सुरू असून पहिल्याच दिवशी सहा जणांवर कोटींच्यावर बोली लागली असून मोनू गोयत याच्यावर हरयाणा स्टिलर्सने सर्वाधिक १.५१ कोटींची विक्रमी बोली लावत आपल्या संघात खेचून घेतले.

तसेच राहुल चौधरीला १.२९ कोटींच्या मोबदल्यात तेलुगू टायटन्सने आपल्या संघात कायम ठेवले. दीपक हुडा व नितीन तोमर यांच्यावर अनुक्रमे जयपूर पिंक पँथर्स व पुणेरी पलटण यांनी प्रत्येकी १.१५ कोटींची बोली लावली. रिशांक देवाडिगाला यूपी योद्धाने १.११ कोटींच्या मोबदल्यात संघात कायम ठेवले. हिंदुस्थानच्या या पाच कबड्डीपटूंसोबतच इराणच्या फजल अत्राचलीनेही एक कोटीची झेप घेतली. यू-मुंबाने त्याला आपल्या संघात घेतले.

 

आपली प्रतिक्रिया द्या