लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदेंना पहिल्या पाचातही स्थान नाही

इंडिया टुडे आणि सीवोटरने लोकांचा कल काय आहे हे जाणून घेण्यासाठी एक सर्व्हे घेतला होता. या सर्व्हेनंतर इंडिया टुडे आणि सीवोटरने देशातील सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण आहेत यांची एक यादी तयार केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्या पाचातही स्थान मिळालेले नाही. मिंधे गटाने केलेली दगाबाजी, गद्दारी ही लोकांना आवडलेली नाही हे या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर योगी आदित्यनाथ (उत्तरप्रदेश, देशभरातील 39.1 टक्के लोकांची पसंती ) हे आहेत. त्याखालोखाल अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, एम.के. स्टॅलिन आणि नवीन पटनायक या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.

आज निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीला जबरदस्त फायदा

इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीने देशभरातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर काय चित्र असू शकेल याचा अंदाज बांधण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राबाबतचे आकडेही त्यांनी जाहीर केले असून हे आकडे मिंधे गट आणि भाजपच्या पोटात गोळा आणणारे आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकासआघाडी एकत्र लढली तर महाराष्ट्रात भाजपला जबरदस्तसगळ्यात मोठा धक्का बसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. इंडिया टुडे आणि सी-व्होटरने केलेल्या सर्व्हेचे हे आकडे भाजप नेत्यांची झोप उडवू शकतात.

महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. आजच्या घडीला जर महाविकास आघाडी निवडणुकांना सामोरी गेली तर मविआ34 जागा जिंकू शकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अपक्ष, इतर पक्ष, शिंदे गट, रिपाइं आणि भाजपच्या वाट्याला मिळून 14 जागा येतील असा अंदाज आहे.

संपूर्ण देशातील एकूण आकडेवारीबाबत अंदाज वर्तवताना या सर्वेक्षणात म्हटले आहे की आज निवडणुका झाल्या तर केंद्रात पुन्हा भाजपचेच सरकार बनू शकेल. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपला बहुमतापेक्षा 10-12 जास्त मिळू शकतात म्हणजेच भाजप 284 चा आकडा गाठू शकतो असं या सर्वेक्षणात म्हटले आहे. आज निवडणुका झाल्यास काँग्रेसला 68 आणि इतर पक्षांना मिळून 191 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.