‘मुडिज’चे रेटिंग पाहता अर्थव्यवस्थेची स्थिती कचऱ्यापेक्षाही वाईट – राहुल गांधी

1319

आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था (रेटिंग एजन्सी) मुडिजने दिलेले रेटिंग पाहता हिंदुस्थानची अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती कचऱ्यापेक्षाही वाईट आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. केंद्र सरकारने गरीब आणि एमएसएमई क्षेत्राला मदत केलेली नाही. त्यामुळे याहून वाईट स्थिती आणखी येणे बाकी आहे, असे त्यांनी सांगितले.

‘मुडिज’ने हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेची रेटिंग 22 वर्षांत पहिल्यांदाच घटविले आहे. बीएए2 वरून रेटिंग बीएए 3 रेटिंग दिले आहेत. यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी अर्थव्यवस्था सांभाळत आहेत. त्यावर मुडिजने अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर रेटिंग दिले आहे. हे रेटिंग पाहता अर्थव्यवस्थेची स्थिती कचऱ्यापेक्षाही वाईट आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

कोरोना महामारीत गरिबांना आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) सरकारने मदत केलेली नाही. त्यामुळे यापेक्षाही वाईट स्थिती येणे बाकी आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आपली प्रतिक्रिया द्या