पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी रत्नागिरीत काँग्रेस व राष्ट्रवादीचा मोर्चा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

देशात आणि राज्यात पेट्रोल व डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. महाराष्ट्रातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती संपुर्ण देशात सर्वात जास्त आहेत. त्यामुळे महागाईसुद्धा वाढली असून यामुळे जनता त्रस्त झाली आहे.

मे २०१४ नंतर शासनाने पेट्रोलच्या करात २११ टक्के वाढ केली. तसेच डिझेलच्या करात ४४३ टक्के वाढ केलेली आहे. केंद्र व राज्य शासनाने पेट्रोल व डिझेलवर अवास्तव कर लावल्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढलेल्या आहेत.

ही परिस्थिती लक्षात घेता जनतेचा आवाज केंद्र व राज्य शासनापर्यंत पोचविण्यासाठी, जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्नावर सोमवारी दिनांक १० सप्टेंबर रोजी भारत बंद करण्याचे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केले आहे.

या सदंर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीने सोमवारी सकाळी ११ वाजता रत्नागिरी जिल्हा काँग्रेस भुवन ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

व्यापारी व जनतेला सहकार्याचे आवाहन
कोकणात १३ सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. या काळात व्यापा-यांचा व्यवसायाचा कालावधी असतो. तसेच मुंबईवरुन चाकरमानीही मोठ्या प्रमाणावर येत असतात. जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून रत्नागिरीत बंदची हाक देण्यात आलेली नाही. केवळ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा.

आपली प्रतिक्रिया द्या