जालना जिल्ह्यात आणखी 71 व्यक्तींचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह

405

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त कोरोना अहवालानुसार काल 10 ऑगस्ट रोजी सोमवारी रात्री उशिरा आणखी 71 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 2986 (अँटिजेंन टेस्टसह) कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून एकूण 100 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधित आढळून आलेल्या 71 रुग्णांमध्ये शहरातील एस. आर.पी.एफ. क्वॉटर परिसर (16), योगेश नगर (6), माळीपुरा, जुना जालना (4), बजाजनगर (2), कन्हैय्यानगर (2), भाजी मार्केट परिसर (2), शकुंतलानगर (2), नाथबाबा गल्ली, लक्ष्मीनारायणपुरा, अंबड रोड, करवा नगर, सिंधी बाजार परिसर,लक्ष्मीकांतनगर, नूतन वसाहत, सराफा बाजार प्रत्येकी एक रुग्ण तर भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगांव (5), जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद शहर(2), आरदखेडा (1), वरखेडा(1), मसरूळ (1), परतूर तालुक्यातील आष्टी (2),परतूर शहर (2), बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर (1), बदनापूर शहर (1), भायगाव (2), तसेच मोहाळी (3), हनन पिंपळगांव (1), दरेगाव (1), खेडगाव (2), किनगाव (1), मेहकर (1), देऊळगाव राजा(2) अशा एकूण 71 रुग्णांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या