देशात 15 लाखहून अधिक रुग्ण झाले बरे, 24 तासात आढळले 53 हजार 601 रुग्ण

386

गेल्या काही दिवसांत देशात 60 हजारपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण सापडत होते. आज त्यात थोडी घट झाली असून 53 हजार 601 रुग्ण सापडले आहेत. तसेच आतापर्यंत 15 लाखहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासात देशात 53 हजार 601 रुग्ण सापडले आहेत. तसेच 871 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 45 हजार 257 वर पोहोचला आहे. देशात एकूण रुग्णांची संख्या 22 लाख 68 हजार 676 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण रुग्णांपैकी 15 लाख 83 हजार 490 रुग्ण बरे झाले आहेत. तर 6 लाख 39 हजार 929 रुग्णांवर उपचार सुरू आहे. कोरोना बाधित रुग्णांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.80 टक्के इतके आहे. तर मृत्यू दर 1.99 टक्के इतका आहे.  

गेल्या 24 तासात 871 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक मृत्यू राज्यात झाले असून त्यांची संख्या 293 इतकी आहे. त्यानंतर तमिळनाडू-कर्नाटकात प्रत्येकी 114, आंध्र प्रदेश 80, उत्तर प्रदेशमध्ये 51 तर पश्चिम बंगालमध्ये 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या