ग्रामपंचायतींनी थकविली ११९ कोटींची वीजबिले

18

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

महावितरणच्या घरगुती, व्यापारी, औद्योगिक आणि कृषी ग्राहकांकडे कोट्यवधींची थकबाकी झालेली असताना संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनीही याला हातभार लावला आहे. या ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या बिलापोटी १९९ कोटी ९२ लाख थकले आहेत.

राज्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील पथदिव्यांची वीज बिलांची थकबाकी स्थानिक  स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून भरण्याबाबतच्या आदेश मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेले आहेत.  महावितरणनेही थकबाकी भरण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना कळविले होते. थकबाकी न भरल्यास ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. असे असतानाही ग्रामपंचायतींकडून थकबाकी भरणा करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ही थकबाकी १९९ कोटी ९२ लाखांवर पोहचली आहे.

परिमंडळातील संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील थकबाकीदार ग्रामपंचायतींची थकबाकी तालुकानिहाय पुढीलप्रमाणे

 • संभाजीनगर तालुका- ३१६ ग्रामपंचायती : १० कोटी ५८ लाख.
 • पैठण तालुका- ३६७ ग्रामपंचायती: ३७ कोटी ३० लाख.
 • गंगापूर तालुका- ३४९ ग्रामपंचायती : २२ कोटी ९२ लाख.
 • रत्नपूर तालुका- १२७ ग्रामपंचायती : ४ कोटी ७३ लाख.
 • फुलंब्री तालुका- १०४ ग्रामपंचायती : ९ कोटी ५२ लाख.
 • कन्नड तालुका-  १८९ ग्रामपंचायती : १० कोटी २२ लाख.
 • वैजापूर तालुका- २४४ ग्रामपंचायती: १८ कोटी ९० लाख.
 • सिल्लोड तालुका – २५२ ग्रामपंचायती : २४ कोटी ७१ लाख.
 • सोयगाव तालुका- १२६ ग्रामपंचायती : ९ कोटी ५७ लाख.
 • जालना तालुका – २०१ ग्रामपंचायती : ५ कोटी ४५ लाख.
 • बदनापूर तालुका १५३ ग्रामपंचायती : ४ कोटी २८ लाख.
 • भोकरदन तालुका- १८९ ग्रामपंचायती : १५ कोटी ५३ लाख.
 • जाफराबाद तालुका- १६८ ग्रामपंचायती : ५ कोटी २४ लाख.
 • अंबड तालुका- २०५ ग्रामपंचायती : ६ कोटी ७२ लाख.
 • परतूर तालुका- ९९ ग्रामपंचायती : ४ कोटी ८७ लाख.
 • घनसावंगी तालुका -१५१ ग्रामपंचायती : ५ कोटी ३७ लाख.
 • मंठा तालुका- १६५ ग्रामपंचायती : ३ कोटी ९८ लाख.
आपली प्रतिक्रिया द्या