
महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांच्या शिक्षणादरम्यान आणि त्यांच्या भविष्यातील रोजगारासाठी संधी शोधत असतात. 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी गुडफेलोजसह फेलोशिपसाठी साइन अप केले आहे. विद्यार्थ्यांच्या या प्रतिसादाने प्रेरित होऊन हिरानंदानी यांनी त्यांच्या सर्व एचएसएनसी कॉलेजसाठी विद्यार्थी फेलोशिपची घोषणा केली.
फेलोशिप सात विभागांमध्ये 3-महिने, 6-महिने आणि 9-महिने इंटर्नशिप प्रदान करते, पण निवडलेल्या विद्यार्थ्याने प्रामुख्याने एकटे राहणाऱ्या आणि सहवासाच्या शोधात असलेल्या ज्येष्ठांसोबत वेळ व्यतित करणे आवश्यक आहे.
फेलोशिप अंतर्गत प्रत्येक महाविद्यालयात एक सामाजिक उद्योजकता कक्ष असेल, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना व्यवसाय आणि शाश्वततेसाठी सामाजिक परिणाम, सर्व फेलोशिप विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र, तसेच त्यांची करिअर पार्श्वभूमी न पाहता त्यांच्या आवडीच्या विभागात शिकण्याची स्वायत्तता हे शिकवण्यासाठी मॉड्यूल असतील.
फेलोशिपचे उद्दिष्ट विद्यार्थी स्तरावरील ज्येष्ठांबद्दल विद्यार्थ्यांना संवेदनशील करण्यासाठी आंतरपिढी मैत्रीचा वापर करणे आणि एकट्याने राहत असलेल्या हिंदुस्थानातील ज्येष्ठांचे जीवन सुलभ करणाऱ्या सहानुभूतीशील व्यक्तींचा समूह तयार करणे हे आहे.
फेलोशिपबाबत सांगताना कुलगुरू हेमलता बागला म्हणाल्या, ‘आम्ही नेहमीच स्वत:ला समाजात परिवर्तन घडवून आणणारी युनिव्हर्सिटी असल्याचे मानले आहे. मानसिकदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या ज्येष्ठांची काळजी घेण्याप्रती माझ्या मनात खास स्थान आहे. मला विश्वास आहे की, गुडफेलोज आमच्या विद्यार्थ्यांकरिता शिकण्यासाठी आणि तरूणांकरिता रोल मॉडेल्स बनण्याची योग्य संधी आहे. माझा सहयोगाच्या मॉडेलवर दृढ विश्वास आहे. गुडफेलोजमध्ये समाज पाहत असलेली संस्था बनण्याची क्षमता आहे.’
फेलोशिपबाबत बोलताना गुडफेलोजचे संस्थापक शंतनू नायडू म्हणाले, ‘आमच्या लॉन्चपासून सीनियर्सकडून विनंती उत्स्फूर्त राहिली आहे आणि अजूनही वाढत आहे. पण गुडफेलो असण्याच्या निकषाशी जुळणारे सहानुभूतीशील तरूण पदवीधर मिळण्याची प्रक्रिया खूपच संथ आहे. हे हिरे खाणकाम करून त्यामधून बारकाईने चांगल्या हिऱ्याची निवड करण्यासारखे आहे. एचएसएनसीसोबतची ही फेलोशिप आम्हाला अशा विद्यार्थ्यांचा एक स्थिर प्रवाह तयार करण्यात मदत करेल, ज्यांची निवड करण्यापूर्वी तपासणी केली जाईल. आम्ही पुढे अधिकाधिक युनिव्हर्सिटींना लक्ष्य करत आहोत, पण हे पहिले उत्तम पाऊल आहे.’