दिलासादयक! गेल्या 24 तासात देशात 36 हजारहून अधिक रुग्ण झाले बरे, मृत्यूदरही झाला कमी

834

कोरोना संकटकाळात एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होत असून मृत्यूदरही कमी झाला आहे. जूनच्या मध्यात मृत्यू दर 3.33 टक्के इतका होता. तर आता तो कमी होऊन 2.15 टक्क्यांवर आला आहे. तर गेल्या 24 तासात 36 हजार 569 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 11 लाखांच्या जवळपास पोहोचली आहे.

कोरोनावर मात कशी करायची हे दिल्ली धारावीकडून शिकली! मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केले स्पष्ट 

गेल्या 24 तासात 57 हजार 117 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 764 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान 5 लाख 25 हजार 6८9 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सलग तिसर्‍या दिवशी 50 हजारहून अधिक रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 4 लाख 22 हजार 11८ रुग्ण सापडले आहेत. तर 2 लाख 56 हजार 158 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात दीड लाख कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत 14 हजार 994 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 10 हजार 320 रुग्ण सापडले असून 265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रिकव्हरी रेट वाढला… राज्यात अडीच लाख रुग्ण कोरोनामुक्त 

आजवर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 56 हजार 158 झाली आहे. 21 लाख 30 हजार 98 नमुन्यांची चाचणी आतापर्यंत करण्यात आली. त्यातील 19.81 टक्के म्हणजेच 4 लाख 22 हजार 118 नमुने पॉझिटिव्ह आले. राज्यभरात 8 लाख 99 हजार 557 नागरिक घरामध्ये क्वारंटाईन आहेत तर 39 हजार 535 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

टेन्शन वाढले, अयोध्येत कोरोनाचे रुग्ण दुप्पट 

मुंबईत 53 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 6 हजार 350 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्क्यांवर आले आहे तर रुग्ण वाढीचा दरही वाढून 76 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली असून आता 20 हजार 569 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 5 लाख 26 हजार 982 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 14,287 वर पोहोचली आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बनवले ‘पेशंट ट्रान्सपोर्ट कवच’, देशातला पहिलाच अभिनव प्रयोग 

मुंबईत 87 हजार कोरोनामुक्त
मुंबईत आज कोरोनाचे 1,100 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 53 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 689 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 87 हजार 74 वर पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या