अफगाणिस्तानमध्ये लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, ५०पेक्षा जास्त ठार

16

सामना ऑनलाईन । काबुल

अफगाणिस्तानमध्ये मझार-ए-शरिफ शहरातील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ५०पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत. लष्करी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करण्यासाठी आलेल्या ६ पैकी ५ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आणि एकाला जीवंत पकडण्यात आले.

हल्लेखोर लष्करी वेषात आले होते. चेकपोस्ट पार करुन लष्करी तळावर प्रवेश केल्यानंतर अंदाधुंद गोळीबार करत दहशतवाद्यांनी हिंसेचे थैमान घातले. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाने स्वतःभोवती स्फोटके लपेटून घेतली होती. गोळी लागताच आत्मघाती दहशतवाद्याच्या शरीरावरील स्फोटकांचा मोठा स्फोट झाला.

कडेकोट बंदोबस्त

लष्करी तळावर दहशतवादी हल्ला होताच अफगाणिस्तानमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. विमानतळ तसेच लष्करी तळांवरील सुरक्षा व्यवस्था आणखी कडेकोट करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या