‘चितळे स्वीटस्’च्या कामगारांना कामावरून काढले

34

सामना प्रतिनिधी । पुणे

मिठाईच्या क्षेत्रामध्ये ब्रँड बनलेल्या चितळे स्वीटस् ऍण्ड स्नॅक्स या कंपनीच्या गुलटेकडी येथील कारखान्यात काम करणाऱ्या सुमारे १२० कामगारांना नोटीस देऊन कामावरून काढण्यात आले. पगारवाढीची मागणी करणाऱ्या कामगारांवर कंपनीने कारवाई केली आहे. या ठिकाणी सुमारे ७० पुरुष आणि ५० महिला आचारी व मदतनीस म्हणून गेल्या २० वर्षांपासून काम करीत आहेत.

chitale-bandhu-removes-empl

या कामगारांनी किमान पाच हजार रुपये पगारवाढ मिळावी यासाठी तीन महिन्यांपासून मागणी केली होती. मागणी मान्य न करता कंपनीने अचानक २ ऑगस्ट रोजी कंपनीच्या गेटबाहेर नोटीस लावून सर्व कामगारांना कामावरून काढून टाकले. दरम्यान, कामगार संपावर असून त्यांना काढून टाकलेले नाही, असे इंद्रनील चितळे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या