विमान सुरक्षा हवेतच! सरकारी संस्थांमध्ये 5 हजारांहून अधिक पदे रिक्त

Air India Flight to Delhi Cancelled After Bird Strike on Landing in Pune

अहमदाबाद येथील भीषण विमान दुर्घटनेनंतर विमान वाहतूक सुरक्षेसंबंधी चर्चा होत आहे. अशातच विमान वाहतूक आणि सुरक्षेवर देखरेख ठेवणाऱ्या सरकारी संस्थांमधील तब्बल पाच हजारांहून अधिक पदे रिक्त असल्याची गंभीर बाब उघड झालीय.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए ), विमान वाहतूकीच्या सुरक्षा बघणारी ब्युरो ऑफ सिव्हील एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस) तसेच विमानसेवांचे संचालन करणाऱ्या विमानतळ प्राधिकरण या संस्थांमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याचे समोर आलंय. विमानतळांच्या पायाभूत सुविधा व्यवस्थापित करणाऱ्या आणि विमान सेवांचे संचालन करणाऱ्या एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया मध्येही तीन हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत.

डीजीसीएमध्ये रिक्त पदे निम्म्याहून अधिक आहेत. संसदीय स्थायी समितीने मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे विमान वाहतुकीच्या सुरक्षा, संरक्षण आणि सेवा व्यवस्थापनात अडथळे निर्माण होऊ शकतात, असे निरीक्षणही नोंदविले होते. चालू आर्थिक वर्षात या संस्थांसाठी करण्यात आलेल्या तरतुदीपैकी सुमारे 30 कोटी रुपये केवळ ‘डीजीसीए’ला मिळाले, मात्र ‘बीसीएएस’ आणि ‘एएआयबी’साठी दिलेला निधी पुरेसा नाही, असेही मत समितीचे मांडले होते.

डीजीसीए
एकूण पदे 1633, रिक्त पदे 879
बीसीएएस
एकूण पदे 599, रिक्त पदे 208
विमानतळ प्राधिकरण
एकूण पदे 19269, रिक्त पदे 3265