गेल्या 24 तासात देशात आढळले कोरोनाचे 19 हजार 148 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 6 लाखांच्या पार

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 19 हजार 148 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 लाखांच्यावर गेली आहे.

देशात एकूण कोरोनाचे रुग्णांची संख्या 6 लाख 4 हजार 641 वर पोहोचली आहे. तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 लाख 26 हजार 947 इतकी आहे. आतापर्यंत एकूण 3 लाख 59 हजार 860 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे 17 हजार 834 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना रुग्णाचे प्रमाण 59.51 टक्के आहे.

एक जुलै पर्यंत देशात 90 लाख 56 हजार 173 कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. 1 जुलै रोजी देशात 2 लाख 29 हजार 588 कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. जगात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या देशांमध्ये हिंदुस्थानचा चौथा क्रमांक लागतो. जगात पहिला क्रमांक अमेरिका नंतर ब्राझील आणि तिसरा क्रमांक रशियाचा लागतो.

आपली प्रतिक्रिया द्या