नगर जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सहा हजारांवर; 41 रुग्णांची भर

289

नगर जिल्ह्यात रविवारी 384 रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता सहा हजारांवर गेली आहे. आतापर्यंत 6 हजार 250 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 67.34 टक्के एवढे आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजेपासून रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत रुग्ण संख्येत 41 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 2 हजार 931 एवढी झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनाने 100 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 9 हजार 281 झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 41 नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मनपा 23, संगमनेर 1, राहाता 1, नगर ग्रामीण 10, कँटोन्मेंट 1, नेवासा 2, शेवगाव 1 आणि कोपरगाव 2 येथील रुग्णांचा समावेश आहे. रविवारी एकूण 384 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा 172, संगमनेर 23, राहाता 3, पाथर्डी 27, नगर ग्रामीण 16, श्रीरामपूर 18, कॅन्टोन्मेंट 13, नेवासा 21, श्रीगोंदा 18, पारनेर 10, अकोले 4, शेवगाव 14, कोपरगाव 39, जामखेड 5, मिलिटरी हॉस्पीटल 1 येथील रुग्णांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या