गेल्या 24 तासात राज्यात आढळले कोरोनाचे साडे सहा हजार रुग्ण, 151 रुग्णांचा मृत्यू

847

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6 हजार 555 रुग्ण आढळले आहेत. तसेच 151 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6 हजार 555 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 6 हजार 619 वर गेली आहे. तसेच गेल्या 24 तासात 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 3 हजार 658 रुग्णांना डिस्ज्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात 86 हजार 40 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 6 लाख 4 हजार 46३ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून 46 हजार जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत एक लाख 11 हजार 740 रुग्ण बरे झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या