कोरोनाचे संकट होतंय कमी, 24 तासांत साडेतीन लाखहून अधिक रुग्ण झाले बरे

देशात कोरोनाची दुसरी लाट असताना आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत तीन लाखहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर साडेतीन लाखहून अधिक रुग्ण बरेही झाले आहेत.

गेल्या 24 तासांत देशात 3 लाख 11 हजार 170 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 2 कोटी 46 लाख 84 हजार 77 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 4 हजार 77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांची संख्या 2 लाख 70 हजार 284 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 3 लाख 62 हजार 437 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 2 कोटी 7 लाख 95 हजार 335 रुग्ण बरे झाले असून सध्या 36 लाख 18 हजार 458 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत 18 कोटी 22 लाख 20 हजार 16 कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या