मुंबईकरांचा वीकेंड जोरात; चार हजारहून अधिक ग्राहकांना घरपोच दारू, लॉकडाऊनमध्ये तीन हजार कोटीहून अधिक महसूल

मुंबईकरांनी आपला वीकेंड जोरात साजरा केला आहे. चार हजारहून अधिक ग्राहकांना घरपोच दारू मिळाली आहे. तर लॉकडाऊनच्या काळात शासनाला मद्याच्या माध्यमातून तीन हजार कोटींहून अधिक महसूल मिळाला आहे.

राज्यात 15 मे  पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. रविवारी दिवसभरात 4 हजार 590  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि  मुंबई उपनगरात 4 हजार 377  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा  देण्यात  आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण 10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 9 हजार 2  अनुज्ञप्ती सुरू  आहेत. राज्य शासनाने 3 मे  पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. राज्यात 15 मे 2020  पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येतआहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या  https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 1 एप्रिल  ते 18 सप्टेंबर या काळात 1 लाख 56 हजार 85  ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी 1 लाख 50 हजार 955 ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.

ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेताना येतअसलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असूनआता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पद्धतीने सुद्धा उपलब्ध आहेत. मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात.

वर्ष 2020-2021 करीता विभागाला 19,225 कोटी रु. महसुल उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. माहे एप्रिल ते ऑगस्ट 2020 पर्यत विभागाला 3842.32 कोटी रु महसुल मिळाला असून गतवर्षीच्या तुलनेत  -37%  घट झालेली आहे.

एप्रिल ते ऑगस्ट 2020 या कालावधीत देशी मद्याची 9.40 को. ब.लि., विदेशी मद्याची 5.88 को. ब.लि., बियर 5.23 को.ब.लि. आणि वाईनची 17.62 लाख ब.लि. विक्री झाली असून गतवषीच्या तुलनेत देशी मद्य  -38%, विदेशी मद्य -33% बियर मद्य -63%, तर वाईन मद्य -39% घट झालेली आहे.

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7  सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.  यासाठी टोल फ्री क्रमांक –  18008333333  व्हाट्सअँप क्रमांक – 8422001133 हा असून  [email protected]  ई-मेल आहे.

आपली प्रतिक्रिया द्या