‘फेसबुक’चा अतिवापर शरीरास हानिकारक

27

सामना ऑनलाईन । मुंबई

सध्याच्या तरूणाईच्या जीवनातील महत्त्वाचा घटक म्हणजे फेसबुक. फेसबुकशिवाय त्यांचा दिवस पूर्णच होऊ शकत नाही. फेसबुकवर फोटो टाकणे, स्टेटस टाकणे, इतरांच्या फोटोला लाईक करणे, कमेंट करणे हे रोजचे काम झालं आहे. एका संशोधनातून असं समोर आलं आहे की, फेसबुकवर वारंवार पोस्ट अपडेट करणे व पोस्ट लाईक करणे यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते.

या विषयासंदर्भाचं संशोधन कॅलिफोर्निया विद्यापीठानं केले आहे. या संशोधनात सहभागींनी त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचं मापन १ ते ४ मध्ये नोंदवलं. तर लाईफ सॅटिस्फॅक्शन १ ते १० मध्ये नोंदवलं. तसंच बॉडी मास इंडेक्सचीही माहिती दिली. या संशोधनात सहभागी झालेल्या नागरिकांनी त्यांचा फेसबुकचा डेटा वापरण्याची परवानगीही संशोधकांना दिली होती. यातून सततच्या फेसबुकवरील स्टेटस अपडेट आणि इतरांच्या पोस्ट लाईक करण्याच्या सवयीचा शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला आहे. यातून अस निष्पन्न झालं की फेसबुकवर स्टेटस अपडेट करणं आणि इतरांच्या पोस्ट लाईक करणं यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

आपली प्रतिक्रिया द्या